Dangar Bhopla Agrowon
ॲग्रो विशेष

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

Shravan Special: चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. २७) बीड जिल्ह्यातून सुमारे वीस टन काशीफळ (डांगर) भोपळ्याची आवक झाली.

Team Agrowon

Chakan News: चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. २७) बीड जिल्ह्यातून सुमारे वीस टन काशीफळ (डांगर) भोपळ्याची आवक झाली. हा भोपळा सुमारे दोन ते दहा किलो वजनाचा आहे.

त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला दहा ते बारा रुपये बाजारभाव मिळाला. श्रावण महिन्यात या भोपळ्यास अधिक मागणी असते, असे व्यापारी कुमार गोरे, बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

बाजारात कांद्याची आवक पाचशे क्विंटल झाली. त्यास प्रतिकिलोला घाऊक बाजारात किमान १० ते कमाल १७ रुपये बाजारभाव मिळाला. पावसामुळे आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. इतर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला अगदी पंधरा ते पंचवीस रुपये बाजारभाव मिळाला.

मध्यप्रदेश राज्यातील इंदोर, उत्तर प्रदेशातील आग्रा येथून तसेच गुजरात राज्यातून बटाट्याची अकराशे क्विंटल आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार तसेच दर्जा नुसार किमान १२ ते १९ रुपये बाजारभाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात

Cotton Picking : पूर्वहंगामी कापसाची वेचणी रखडत

Crop Damage Compensation : दिवाळीआधी आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत ः पाटील

Rainfall Update : वाशीम, अकोल्यात पावसाचा पुन्हा जोर

Rain Crop Damage : २८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका

SCROLL FOR NEXT