Chili Production Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Production : सुधारित तंत्रातून मिरची उत्पादन वाढ शक्य

Agriculture Technique : मिरची पिकामध्ये उत्पादनवाढीची चांगली संधी आहे. हे पीक एकाच क्षेत्रावर वारंवार घेऊ नये.

Team Agrowon

Pune News : मिरचीच्या अपेक्षित उत्पादनासाठी सुयोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. योग्य जातीची निवड, जमिनीची सुपीकता, अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचबरोबरीने कीड,रोग नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करावी, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी दिला.

‘सकाळ-ॲग्रोवन’ आणि ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने सारोळा (ता.सिल्लोड) येथे शनिवारी (ता. २०) आयोजित मिरची लागवड आणि कपाशी खत व्यवस्थापन या विषयावर डॉ. पाटील यांनी ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

चर्चासत्राला कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक ज्योतिबा माने, कृषी विद्यावेत्ता सचिन पाटील, ब्रँडिंग मॅनेजर अमित जैन, मोहन गायकवाड, नारायण वराडे, दीपक गवळे, मारुती वराडे, राजू वराडे, सैन्य दलातील उमेश साखळे, पोलिस दलातील रमेश लहाने आदी उपस्थित होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी केले.

डॉ. पाटील म्हणाले, की मिरची पिकामध्ये उत्पादनवाढीची चांगली संधी आहे. हे पीक एकाच क्षेत्रावर वारंवार घेऊ नये. पिकाची फेरपालट महत्त्वाची आहे. तापमानातील बदल पिकाची उत्पादकता कमी होण्यास कारणीभूत आहे.

रोपांना हार्डनिंग करणे अत्यावश्यक आहे. गादीवाफ्यावर लागवड करावी. त्यामध्ये पुरेसे शेणखत, गवताचा भुसा मिसळावा. जमिनीचा योग्य निचरा आवश्यक आहे. वाढीच्या टप्यात योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.

कोरोमंडलचे कृषी विद्यावेत्ता सचिन पाटील यांनी खतांचे बदलते स्वरूप, सल्फरचे महत्त्व, बाजारात उपलब्ध रासायनिक खतांचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म आदींची सविस्तर माहिती दिली. कोरोमंडलचे श्री. जैन यांनी विद्राव्य खताची मात्रा कशी असावी, ती कधी द्यायला हवी याची माहिती दिली.

कोरोमंडलचे उदय चौधरी यांनी खताची उपलब्धता कशा पद्धतीने करून दिली जाते, याविषयी माहिती दिली. ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे आणि सकाळचे वितरक राजू गवळी यांनी चर्चासत्राचे नियोजन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT