Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Apmc Election : जळगाव बाजार समिती निवडणुकीत अनेकांना नेत्यांच्या आदेशांची प्रतीक्षा

जळगाव जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. २९) ७३ अर्ज दाखल झाले होते. धुळ्यातही शिरपूर, धुळे, साक्री आणि दोंडाईचा (ता. शिंदखेडा) बाजार समितीसाठी मिळून २४ अर्ज दाखल झाले होते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजार समितीच्या निवडणुकांचा (Market Committee Election) धुरळा उडू लागला आहे. यातच अनेकांनी अर्ज घेतले आहे, परंतु नेत्यांच्या आदेशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे दाखल अर्जांची संख्या कमीच आहे.

जळगाव जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. २९) ७३ अर्ज दाखल झाले होते. धुळ्यातही शिरपूर, धुळे, साक्री आणि दोंडाईचा (ता. शिंदखेडा) बाजार समितीसाठी मिळून २४ अर्ज दाखल झाले होते.

तर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा व नंदुरबार बाजार समितीसाठी सुमारे १७ अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्या त्या बाजार समित्यांमध्ये पदे भूषविलेल्या आणि दिग्गजांनी अर्ज घेतले आहेत.

अर्ज विक्री खानदेशात एक हजारांवर झाली आहे. परंतु अर्ज दाखल संख्या कमी आहे. काही जण मुहूर्त शोधत आहेत. अनेकांनी नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर किंवा पॅनेल गठित झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

पॅनेलबाबत खल...

पॅनेलबाबत खल सुरूच आहे. शहादा येथे भाजपप्रणीत पॅनेल जवळपास निश्‍चित झाले आहे. विरोधात अभिजित पाटील यांचे पॅनेल असणार आहे. नंदुरबारात पालकमंत्री विजयकुमार गावित व चंद्रकांत रघुवंशी यांच्या भूमिकांबाबत उत्सुकता आहे.

धुळ्यात भाजपचे पॅनेलही निश्‍चित आहे. समोर आमदार कुणाल पाटील यांच्याकडेही उमेदवारांची गर्दी झाली आहे. शिरपुरात अमरिश पटेल यांनीही पॅनेल गठित केले आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव - एरंडोल बाजार समितीबाबत उत्सुकता असून, या दोन्ही बाजार समित्यांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून तुल्यबळ उमेदवार दिले जातील, असे दिसत आहे.

जामनेरात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे आपले समर्थक व इतर अभ्यासू मंडळीला सोबत घेऊन पॅनेल देण्याच्या तयारीत आहेत. रावेर व यावलमध्येही दोन्ही काँग्रेस व भाजप, अशी लढाई दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation: आंबा-काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषिमंत्र्यांना घेरले

PACS Computerization: बारा हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण

Maharashtra Sowing Update: राज्यात केवळ तीन टक्के पेरण्या

Maharashtra Rain Forecast: राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT