Orange Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop : विदर्भ विकासात संत्रावर्गीय पीक महत्त्वाचे

Dr. Sharad Gadakh : विदर्भातील गोड संत्रा दिल्लीसह राज्यातील इतर बाजारपेठांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करून शाश्वत विदर्भाचे विकासात भरीव योगदान देणार आहे.

Team Agrowon

Akola News : विदर्भाची भौगोलिक रचना व जैवविविधता लक्षात घेता फळ पिकांसाठी विशेषतः संत्रावर्गीय पिकांसाठी अतिशय उपयुक्त वातावरण आहे. विदर्भातील गोड संत्रा दिल्लीसह राज्यातील इतर बाजारपेठांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करून शाश्वत विदर्भाचे विकासात भरीव योगदान देणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत अचलपूर कृषी संशोधन केंद्र व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी संत्रा विपणन या विषयावर अचलपूर तालुक्यातील सालेपुर येथे कार्यशाळा झाली. आशिष कळमकर यांच्या संत्रा बागेत आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी दिनेश वराडे, अनुभवी संत्रा उत्पादक शेतकरी रमेश जिचकार, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, उद्यान विद्या विभागाचे अधिष्ठाता तथा इंडो इस्राईल संत्रा तंत्रज्ञान प्रकल्पाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. देवानंद पंचभाई, फळशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक भराड, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे, विस्तार शिक्षण संचालनालयातील मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने, कृषी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश चर्जन, डॉ. राजेंद्र वानखेडे, सोनल नागे, डॉ. प्रशांत मगरे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण मडगे, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत संत्रा पिकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. संत्रा फळगळ, फायदेशीर उत्पादन तंत्रज्ञान, बाजारपेठा, प्रक्रिया उद्योग आदींबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सालेपुर गावचे उपसरपंच रमेश पाटील, संत्रा उत्पादक शेतकरी रवी पाटील यांच्यासह संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांचे अभ्यासक तज्ज्ञ संत्रा उत्पादक प्रदीप बंड (जसापूर), नाकट (परतवाडा), राहुल उभाड (भिलोना), संदीप चरपे (तोंडगाव), आर. जी. राऊत यांच्यासह इतर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT