Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पंच्याहत्तर मध्यम प्रकल्पांत सहा टक्केच उपयुक्त पाणी

Water Stock : मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्येही ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ ६ टक्के उपयुक्तपणे उरले असून १५२ लघूउद्योग प्रकल्प कोरडे पडले आहेत.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीत केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर, माजलगाव, सीना कोळगाव, निम्न तेरणा हे प्रकल्प मृत्तसाठ्यात गेले आहेत. मांजराही मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहे.

येलदरीत २९ टक्के, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ३६ टक्के, निम्न मनारमध्ये २५ टक्के तर विष्णुपुरी २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ७, लातूरमधील ८ प्रकल्पांत प्रत्येकी तीन टक्के उपयुक्त पाणी आहे.

धाराशिव जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत केवळ दोन टक्के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत १८ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पांत ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. परभणीमधील दोन्ही मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंब नाही.

सहा मध्यम प्रकल्प कोरडे

कोरड्या पडलेल्या सहा मध्यम प्रकल्पांत बीडमधील तीन, धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. ३७ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये जालना व बीड मधील प्रत्येकी पाच, छत्रपती संभाजीनगरमधील ११, लातूरमधील तीन, धाराशिवमधील दहा, नांदेडमधील एक, परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

१४६ लघू प्रकल्प कोरडे

७५० लघू प्रकल्पांपैकी १४६ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये धाराशिवमधील ६८, बीडमधील ४९, लातूरमधील ११ व छत्रपती संभाजीनगरमधील १८ प्रकल्पांचा समावेश आहे. ३२८ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून त्यामध्ये सर्वाधिक ९५ लघू प्रकल्प धाराशिवमधील आहेत.

त्या पाठोपाठ लातूरमधील ७७, बीडमधील ४८, जालनातील १४, छत्रपती संभाजीनगरमधील ३६, नांदेडमधील २६, परभणी मधील १८, हिंगोलीतील १४ लघू प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT