Crop Loan
Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : मराठवाड्यात केवळ ६७ टक्‍के कर्जपुरवठा

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Crop Loan News : मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याची गती काही केल्या वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगीतून कर्ज (Karj) उचल करून आपल्या शेतीच्या गरज भागविण्यामुळे कर्जाच्या चक्रात अडकून पडण्याची वेळ येत आहे.

यंदाच्या रब्‍‌बी हंगामासाठी (Rabbi Season) मराठवाड्यासाठी निश्‍चित उद्दिष्टाच्या तुलनेत २० फेब्रुवारीपर्यंत केवळ ६७ टक्‍केच कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंकांच्या कामगिरीवरून तरी हेच स्पष्ट होते आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यंदा रब्‍‌बी हंगामासाठी ४३३७ कोटी २८ लाख २० हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्‍‌ट देण्यात आले होते. रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांना पूर्ण करता आले नसल्याची स्थिती आहे.

मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत २० फेब्रुवारी अखेरपर्यंत मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती, व्यापारी व ग्रामीण बॅंकांनी मिळून आठही ३ लाख ३२ हजार ३८८ शेतकऱ्यांनाच केवळ ६७.३५ टक्‍के म्हणजे २९२१ कोटी २६ लाख ५२ हजार रुपयांच्या कर्जाचाच पुरवठा केला आहे.

यामध्ये व्यापारी बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्वाधिक ७६.७१ टक्‍के त्या पाठोपाठ ग्रामीण बॅंकेने ६३.१० टक्‍के, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्वात कमी केवळ ४२.४२ टक्‍केच कर्जपुरवठा केला आहे.

मराठवाड्यातील सहकार विभागाच्या लातूर विभागातील चार जिल्ह्यांत २१४९ कोटी ९४ लाख ८५ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७२.६२ टक्‍के उद्दिष्टपूर्ती करताना बॅंकांनी १ लाख ५६ हजार ७१४ शेतकऱ्यांना १५३५ कोटी ८४ लाख २६ हजार रुपये कर्जपुरवठा केला.

औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत २२२२ कोटी ३३ लाख रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत ६२.३४ टक्‍के उद्दिष्टपूर्ती करताना सर्व बॅंकांनी १ लाख ७५ हजार ६७४ शेतकऱ्यांना १३८५ कोटी ४२ लाख २६ हजार रुपये कर्जपुरवठा केला.

एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याची भाषा करीत असताना शेतीसाठी आवश्‍यक पतपुरवठा करण्यात बॅंका मात्र अनास्था दाखविताना दिसत असल्याचे चित्र आहे.

जिल्हानिहाय उद्दिष्ट, कर्जपुरवठा व टक्‍केवारी

जिल्हा औरंगाबाद

उद्दिष्ट ७४५ कोटी ४० लाख ८३ हजार

कर्जपुरवठा ३५६ कोटी ६९ लाख १८ हजार

शेतकरी ३९४९८

टक्‍केवारी ४७.८५

जिल्हा जालना

उद्दिष्ट ४८० कोटी १० लाख ८४ हजार

कर्जपुरवठा २७२ कोटी ७६ लाख ९६ हजार

शेतकरी ३२०७५

टक्‍केवारी ५६.८१

जिल्हा परभणी

उद्दिष्ट ६२४ कोटी ८१ लाख ६८ हजार

कर्जपुरवठा ४७३ कोटी २९ लाख ७१ हजार

शेतकरी ६२११९

टक्‍केवारी ७५.७५

जिल्हा हिंगोली

उद्दिष्ट ३७२ कोटी

कर्जपुरवठा २८२ कोटी ६६ लाख ४१ हजार

शेतकरी ४१९८२

टक्‍केवारी ७५.९८

जिल्हा लातूर

उद्दिष्ट ५७९ कोटी ३५ लाख

कर्जपुरवठा ३८० कोटी ५४ लाख ४९ हजार

शेतकरी ३४४४३

टक्‍केवारी ६५.६८

जिल्हा उस्मानाबाद

उद्दिष्ट ५३१ कोटी ७८ लाख

कर्जपुरवठा २९५ कोटी ६५ लाख

शेतकरी २५३९२

टक्‍केवारी ५५.६०

जिल्हा बीड

उद्दिष्ट ४४० कोटी

कर्जपुरवठा ३९० कोटी ६७ लाख ७७ हजार

शेतकरी ४०५२९

टक्‍केवारी ८८.७९

जिल्हा नांदेड

उद्दिष्ट ५६३ कोटी ८१ लाख ८५ हजार

कर्जपुरवठा ४६८ कोटी ९७ लाख

शेतकरी ५६३५०

टक्‍केवारी ८३.१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT