Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांना यंदाही १ रुपयात पीकविमा ; विमा भरण्यास आजपासून सुरूवात

Kharif Season Crop Insurance : राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी आजपासून (ता.१८) विमा भरण्यास सुरूवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी आजपासून (ता.१८) विमा भरण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेच्या https://www.pmfby.gov.in अधिकृत पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी शेतकऱ्यांना अधिसुचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून शेतकऱ्यांनी यापूर्वी पीकविमा भरावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.

या पिकांचा योजनेत समावेश

गेल्यावर्षी पीकविमा योजनेत विक्रमी १ कोटी १द लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरून योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगाम २०२४ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा या १४ पिकांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे.

योजनेतील वैशिष्ट पूर्ण बाबी

विमा योजनेत समाविष्ट पिके भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी आवश्यक

शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे , उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद यांची जमीन वर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल.

या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. या वर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञान चा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनास ६० % भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा, पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात , आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे.

विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरताना केवळ एकच रुपया शुल्क म्हणून भरायचे आहे. विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत : पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतक-याने काय करावे?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसदेखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.

इतर बिगर कर्जदार शेतक-याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत दि. १५ जुलै २०२४ आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT