Papaya Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Rate : खानदेशात पपईला १९ रुपये किलो दर निश्चित ; शिरपूर बाजार समितीच्या बैठकीत निर्णय

Papaya Market Price in Khandesh : खानदेशात पपईला १९ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर खरेदीदार देतील, असा निर्णय शिरपूर (जि. धुळे) येथील बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपईला १९ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर खरेदीदार देतील, असा निर्णय शिरपूर (जि. धुळे) येथील बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. खरेदीदार, व्यापारी, संचालक, शेतकरी आदी या बैठकीत उपस्थित होते.

पपई दर १५ रुपये प्रतिकिलो थेट किंवा जागेवर शेतकऱ्यांना दिले जातील व शेतकऱ्यांनीही या दरांना होकार दिल्याचा बनावट संदेश समाज माध्यमांत व्हायरल झाल्याने गदारोळ झाला होता. नंदुरबारातील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर भागात शेतकऱ्यांनी यासंबंधी दोषींवर कारवाईची मागणी केली व १५ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना किंवा पपई उत्पादकांना मंजूर नसल्याचे म्हटले होते.

दराचा तिढा वाढत असतानाच शिरपूर बाजार समितीने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी बैठक घेतली. त्यात पपईला थेट किंवा जागेवर खरेदीसंबंधी व्यापारी किंवा खरेदीदार १९ रुपये प्रतिकिलोचा दर देतील, असा निर्णय झाला.

यास पपई उत्पादक, खरेदीदार व संचालकांनीदेखील होकार दिला. तसेच पपई काढणी सुरू करावी, असे आवाहन संचालक, शेतकऱ्यांनी या बैठकीतून केले. बैठकीत सभापती कांतिलाल पाटील, लक्ष्मीकांत पाटील, शेतकरी पवन पाटील, धनराज गुर्जर, दिनेश पाटील, गणेश चौधरी, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT