sandeep Shirguppe
पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, असे भरपूर व्हिटॅमिनचे घटक असतात.
पपईत कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटकही असतात याचा आरोग्यासाठी फायदा होतो.
पपई पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोइड्सचे घटक असतात.
पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मधुमेहातही फायदा होतो.
डायटफिटच्या आहारतज्ञ अबर्ना मॅथेवनन यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याची सर्वोत्तम वेळ आहे.
पपईमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
रोज सकाळी पपई खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक, त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
रोज सकाळी पपई खाणे तुमच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
पपईमुळे शरीर डिटॉक्स करते, त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. त्यात लाइकोपीन असते, जे त्वचेचे अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करते.
याचबरोबर पपई खाल्ल्याने पिंपल्स, पिगमेंटेशन, सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या दूर होते.