Agrowon Sanvad Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : कपाशी, सोयाबीन पिकांत व्यवस्थापनाला महत्त्व

Agriculture Update : शेतकऱ्यांनी कुठलेही सूक्ष्म अन्नद्रव्य फवारले तरी परिणाम मिळू शकतो, असा सल्ला अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ (कृषिविद्या) कुलदीप देशमुख यांनी दिला.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशी, सोयाबीन या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. सध्या सोयाबीन पिवळे पडत असून झिंक व आर्यनच्या कमतरतेमुळे हे होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कुठलेही सूक्ष्म अन्नद्रव्य फवारले तरी परिणाम मिळू शकतो, असा सल्ला अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ (कृषिविद्या) कुलदीप देशमुख यांनी दिला.

‘सकाळ-ॲग्रोवन’ आणि कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कापूस व सोयाबीन पिकांतील खत व्यवस्थापन’ या विषयावर ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम उरळ (ता. बाळापूर) येथील महादेव मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता.२२) सायंकाळी झाला.

या वेळी श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाला कोरोमंडलचे कृषी विद्यावेत्ता डॉ. विक्रम कापसे, विपणन अधिकारी प्रशांत डोणगावकर, श्‍यामली ॲग्रो सेंटरचे सहदेव घोडस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना श्री. देशमुख म्हणाले, की कपाशी पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कपाशी पिकात योग्य प्रकारे खताचे नियोजन करावे. तसेच कपाशीच्या वाढीसाठी, वाढ रोखण्यासाठी संतुलीत प्रमाणात संबंधित घटकांचा वापर करायला हवा, असेही ते म्हणाले. सध्या अनेक भागांत सोयाबीन पिवळे पडत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. सोयाबीन पिकावरील हा पिवळेपणा झिंक व आर्यनची कमतरता असल्याने तयार होत आहे.

यासाठी कोणतेही सूक्ष्म अन्नद्रव्य फवारले तरी चालू शकते, असेही ते म्हणाले. या वेळी देशमुख यांनी सोयाबीन, कपाशी पिकांचे लागवड तंत्रज्ञान, या पिकांमधील तणनियंत्रणासाठी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कापसे कोरोमंडलाच्या उत्पादनांची तर श्री. डोणगावकर यांनी कोरोमंडल कंपनीविषयी सविस्तरपणे माहिती देत संवाद साधला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सकाळ’चे वितरण विभाग व्यवस्थापक संतोष जुमडे यांनी केले. ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी अनंता शिंदे, कोरोमंडलचे प्रतिनिधी गणेश सोळंके यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT