Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Bhavantar Yojana: कांद्याला भावांतर योजना लागू करा

Nashik Onion Farmer: गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. त्यामुळे विक्री झालेल्या कांद्याला सरासरी ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर पकडून राज्य सरकारने १ जूनपासून भावांतर योजना लागू करावी.

Team Agrowon

Nashik News: गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. त्यामुळे विक्री झालेल्या कांद्याला सरासरी ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर पकडून राज्य सरकारने १ जूनपासून भावांतर योजना लागू करावी. तसेच नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे पूर्ण करून त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने केली आहे.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा रोपवाटिका खराब झाल्याने यंदा कांदा लागवड एक महिना उशिराने झाली. मजूरटंचाई, भेसळयुक्त खते, लागवडीचा वाढलेला खर्च, खतांचे वाढलेले भाव या सर्व अडचणींना तोंड देत शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवला; मात्र काढणीच्या वेळेला मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

ज्या शेतकऱ्यांनी कसा बसा कांदा वाचविला त्यालाही कवडीमोल भाव मिळत असून शेतकरी संकटात आहे. खर्च देखील निघत नाही. उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी बागलाण तालुका शेतकरी संघटनेने तहसीलदारांना मागण्याचे निवेदन दिले आहे. भावांतर योजना लागू करण्यासह, नुकसान झालेले पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या. तसेच १ जूनपासून सरकारने ३००० क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावी.

जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी संघटना मातीमोल भावात विकला गेलेला कांदा महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या दरात ओतणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला.

या वेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर बागूल, उपाध्यक्ष देविदास अहिरे, युवा आघाडी अध्यक्ष नयन सोनवणे, सरचिटणीस सुनील बिरारी, सुदर्शन वसंतराव जाधव, विवेक सोनवणे, राकेश अहिरे, त्र्यंबक जाधव, भिका सूर्यवंशी, राजीव सावंत, पोपट अहिरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Sugar Industry: साखर उद्योग अडचणीत, समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारकडून समिती गठित

Groundnut Procurement: जामोदमध्ये उघड लिलाव पद्धतीने भुईमूग खरेदी सुरू

SCROLL FOR NEXT