Agriculture Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषी पंपाला नवीन कनेक्शन देण्याचे धोरण स्वीकारावे

Agriculture Pump Connection : ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विंधनविहिरी (बोअर) सातशे ते आठशे फूट खोल आहेत आणि अशा ठिकाणी सोलार पंप व्यवस्थित काम करत नाही.

Team Agrowon

Latur News : शेतीपंपांसाठी नवीन कनेक्शन बंद असून सोलार पंप घेणे शेतकऱ्यांना बंधनकारक केले जात आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विंधनविहिरी (बोअर) सातशे ते आठशे फूट खोल आहेत आणि अशा ठिकाणी सोलार पंप व्यवस्थित काम करत नाही.

ही बाब विचारात घेऊन निकषांच्या अधीन राहून शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन देण्याचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे केली आहे.

यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील महापारेषणचे कार्यालयाचे विभाजन करुन लातूर, धाराशिव व इतर एक ते दोन जिल्ह्यांसाठी लातूर येथे स्वतंत्र महापारेषण कार्यालय सुरु करावे, अशी मागणीही त्यांनी लोकेश चंद्र यांच्याकडे केली आहे.

औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने व अखंडित विद्युत पुरवठा करण्या बरोबरच रोहित्र वेळेवर दुरुस्त करून देणे, विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढ करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, मंजूर नवीन उपकेंद्राचे काम तातडीने सुरु करणे आणि फिडर सेपरेशनची कामे प्राधान्याने पूर्ण करणे, आदी मागण्यांही आमदार पवार यांनी लोकेश चंद्र यांच्याकडे केल्या आहे. औसा मतदारसंघातील आरटीसीसी योजनेअंतर्गत कामे संथगतीने सुरू असून कामे वेगाने पूर्णत्वास नेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात.

आरडीएसएस -एमएचकेव्हीवाय दोन अंतर्गत अनेक कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित झाले आहेत. पण कामे सुरू झाली नाहीत, अशा कामांचा आढावा घेऊन रखडलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावीत खरोसा, तपसे चिंचोली व औसा विद्युत उपकेंद्रांची क्षमता पाच एमव्हीए ने वाढविण्यास कार्यारंभ आदेश निर्गमित झालेले आहेत,

या तिन्ही विद्युत उपकेंद्रांची तातडीने क्षमता वाढ करण्यात यावी. एडीबी योजनेअंतर्गत ६३ केव्हाही क्षमतेच्या रोत्रित्रांची क्षमता वाढवून १०० केव्हाही करता येते, सदरील योजना कार्यान्वित करण्यात यावी.महावितरणच्या निरंतर योजनेअंतर्गत दोनशे रोहित्र उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यांवरही लोकेश चंद्र यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT