Orange Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop : संत्रा पिकात एकीकृत व्यवस्थापन करा

Integrated Crop Management : जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत असून अकोट, तेल्हारा तालुके या उत्पादनात अग्रेसर आहेत.

Team Agrowon

Akola News : गुणवत्तायुक्त व निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी एकीकृत व्यवस्थापन गरजेचे आहे, असे प्रतिपादन केव्हीकेचे उद्यानविद्या विषय विशेषतज्ज्ञ गजानन तुपकर यांनी असे केले. केव्हीकेतर्फे बुधवारी (ता. ११) ‘संत्रा लागवड व कीडरोग व्यवस्थापन’ या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.

या वेळी मार्गदर्शन करताना श्री. तुपकर बोलत होते. या वेळी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे. व्यासपीठावर डॉ. उमेश ठाकरे, गजानन तुपकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत असून अकोट, तेल्हारा तालुके या उत्पादनात अग्रेसर आहेत. हे लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र व आत्मा विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संत्रा पीक लागवड तंत्राबाबत श्री. तुपकर म्हणाले, की संत्रा पिकासाठी जमिनीची निवड, जमिनीचे पाणी आणि माती नमुना गोळा पद्धत, खड्डे कधी आणि किती आकाराचे खोदावे तसेच खड्डा कशा प्रकारे भरावा, कलम निवडताना कोणत्या खुंटावरील निवडावी, कलमांची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना पाच वर्षांखालील आणि पाच वर्षांवरील झाडांना कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, सिंचन व्यवस्थापन, दुहेरी अळ्याचा वापर, छाटणी तंत्र तसेच मृग आणि आंबिया बहरतील अडचणी आणि उपाययोजना या विषयी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रक्षेत्र व्यवस्थापक स्वप्नील कोंडे यांनी संत्रा पिकांवरील महत्त्वाच्या किडी आणि रोगांवर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री. राहुल अडाणी यांनी मानले.

शेतकरी कंपनी स्थापन करा ः डॉ. इंगळे

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी आत्मा प्रकल्प संचालक मुरली इंगळे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.

समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र यावे ः डॉ. ठाकरे

केव्हीकेचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांनी समविचाराच्या आणि प्रयत्नशील लोकांनी एकत्र येऊन सक्षम गट तयार करून संत्रा उत्पादक कंपनी तयार करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. निर्यात कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, या विषयी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT