Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC : सोलापुरात बेकायदेशीर संपामुळे शेतकरी, बाजार समिती, व्यापाऱ्यांचे नुकसान

APMC Strike : अचानक संप पुकारून शेतकऱ्यासह बाजार समितीचे नुकसान करणाऱ्या हमालांवर कारवाई करणार अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक तथा पणन विभागाचे सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News : उत्तर सोलापूर ः अचानक संप पुकारून शेतकऱ्यासह बाजार समितीचे नुकसान करणाऱ्या हमालांवर कारवाई करणार अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक तथा पणन विभागाचे सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी दिली.

बुधवारपासून गृहमंत्री अमित शहा यांच्या तथाकथित वक्तव्यावरून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी अचानक आंदोलन पुकारले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्‍तव्याबाबत बाजार समिती येथील माथाडी कामगारांनी बुधवारी रात्री, गुरुवारी दिवसभर संप पुकारल्याने शेतकरी, बाजार समितीसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

यानंतर शनिवारी बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर पुण्याहून सोलापुरात दाखल झाले. त्यांनी यावेळी माध्यमांना माहिती देताना सांगितले की बाजार समितीतील कुठल्याही घटकाला अचानक संप पुकारता येत नाही. यामुळे या बेकायदेशीर संपाबाबत हमालांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल व त्यानंतर पुढील कारवाई होईल.

शेतकरी, बाजार समितीचे कर्मचारी, व्यापाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी शेतमाल गाड्यांतून खाली उतरविला. त्यानंतर कांद्यासह इतर सर्व शेतमालांचा लिलाव करण्यात आले. मात्र, लिलाव झालेला माल पुन्हा गाड्यांमध्ये लोडिंग करण्यासाठी माथाडी कामगारांनी नकार दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पडून होता. तो माल शनिवारी लोडिंग करून बाहेर काढण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे हाल

बुधवारी हमालांनी अचानक संप पुकारल्यामुळे कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे फार हाल झाले. शेतकऱ्यांनी स्वतः कांदा गाडीतून उतरवला. यावेळी शेतकऱ्यांना हमालांकडून दमदाटी केल्याचा दावा केला जात आहे. हा उतरवलेला कांदा राखण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी रात्रभर कांद्याजवळ बसून राहिले. दरवेळेस बाजारातील विविध घटक संप पुकारतात मात्र याचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT