Pesticide Seizure Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Pesticides : साडेनऊ लाखांची अवैध, विनापरवाना कीटकनाशके जप्त

Pesticide Seizure : नाशिक शहरातील अंबड एमआयडीसी येथील दातीर मळा परिसरात एका बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेला सुमारे ९.५० लाख रुपयांचा अवैध कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने जप्त केला.

Team Agrowon

Nashik News : नाशिक शहरातील अंबड एमआयडीसी येथील दातीर मळा परिसरात एका बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेला सुमारे ९.५० लाख रुपयांचा अवैध कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने जप्त केला.

कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी,

विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील, मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, तंत्र अधिकारी विजय चौधरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल अहिरे यांच्या भरारी पथकाने दातीर मळा एमआयडीसी अंबड येथील विनोद कुंभार यांच्या मालकीच्या बंद गाळ्यावर छापा मारून अवैध व विनापरवाना कीटकनाशकांचा साठा जप्त केला.

संशयित गाळामालक विनोद कुंभार व संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलिस स्टेशन नाशिक येथे डॉ. जगन सूर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT