Turmeric Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric MSP : सत्ता मिळाल्यास हळदीची आधारभूत किंमत वाढवू

Rahul Gandhi : जगत्याल येथे आयोजित सभेदरम्यान राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही येथील शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामागे किमान आधारभूत किमतीपेक्षा ५०० अधिक देऊ.

Team Agrowon

Latest Agriculture News : तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास हळदीच्या उत्पादनावर शेतकऱ्याला प्रती क्विंटलमागे १२ ते १५ हजार किमान आधारभूत किंमत देऊ, असे आश्‍वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. २०) जगत्याल येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिले.

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी तेलंगणात विजयभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. जगत्याल येथे आयोजित सभेदरम्यान राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही येथील शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामागे किमान आधारभूत किमतीपेक्षा ५०० अधिक देऊ.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वेळी राहुल यांनी सत्तेत आल्यास जातिनिहाय जनगणना घेण्याचे पुन्हा आश्‍वासन दिले. त्याचप्रमाणे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात करण्यात आलेला जातिनिहाय जनगणनेचा तपशील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जनतेसमोर येऊ दिला नाही, असा आरोपही गांधी यांनी या वेळी केला. केंद्रात सत्तेत आल्यास हा तपशीलदेखील सार्वजनिक करण्यात येईल, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी ‘रोड शो’ दरम्यान, रस्त्याशेजारील खाण्याच्या एका टपरीवर डोसाही बनवून पाहिला त्याचप्रमाणे रोड शोमध्ये त्यांना भेटणाऱ्या लहान मुलांना चॉकलेटही दिले.

‘बीआसएस’ ‘एमआयएम’वर टीका

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि ‘एमआयएम’वर देखील जोरदार टीका केली. हे तीनही पक्ष एकमकांना मदत करत असून, राव यांचा पक्ष लोकसभेत भाजपला पाठिंबा देतो, असा आरोप गांधी यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT