Dr. Indra Mani  Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Indra Mani : कृषी पदवीधर, शेतकरी एकत्र आले, तर अर्थक्रांती होईल

Vice Chancellor Dr. Indra Mani : कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत कृषी पदवीधरांच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्मितीचे काम कृषी विद्यापीठाकडून केले जात आहे.

Team Agrowon

Parbhani News : कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत कृषी पदवीधरांच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्मितीचे काम कृषी विद्यापीठाकडून केले जात आहे. कृषी पदवीधर व शेतकरी एकत्र आले तर अर्थक्रांती होईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय सभागृहामध्ये शनिवारी (ता. २०) कृषी पदवीधर राज्य सहकारी पत संस्था मर्यादितच्या (अॅग्रीकॉस स्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.) सभासद नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. किशनराव गोरे होते.

आमदार सुरेश वरपुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, अॅग्रीकॉस को ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य प्रवर्तक अनंत चोंदे पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हारणे, माजी प्रशासकीय अधिकारी धनराज केंद्रे, विश्‍वंभर गावंडे उपस्थित होते.

अनंत चोंदे पाटील म्हणाले, की माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून कृषी पदवीधराची राज्य स्तरीय पत संस्था सुरू केली जात आहे. कृषी पदवीधरांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाईल.

कृषी विद्यापीठात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासह आयआयटीच्या धर्तीवर कृषी विद्यापीठातील वसतिगृहांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. डॉ. गोरे म्हणाले, की राज्यभरातील कृषी पदवीधरांना एकत्र करण्याचे काम ही पतसंस्था करेल. त्यासाठी सभासद संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सूत्रसंचालन रवी पतंगे यांनी केले. टी. पी. कदम, धनंजय देशमुख, अजय चौधरी, विशाल जाधव आदींनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT