APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Madhya Pradesh APMC : मध्य प्रदेशात हमाल-मापाऱ्यांना ओळखपत्र

APMC News : बाजार समिती परिसरात असामाजिक तत्त्वांचा वाढता वावर व त्या माध्यमातून भविष्यात अनुचित घटना होण्याची शक्‍यता पाहता मध्य प्रदेश पणन मंडळाने हमाल, मापाऱ्यांना ओळखपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

Team Agrowon

Nagpur News : बाजार समिती परिसरात असामाजिक तत्त्वांचा वाढता वावर व त्या माध्यमातून भविष्यात अनुचित घटना होण्याची शक्‍यता पाहता मध्य प्रदेश पणन मंडळाने हमाल, मापाऱ्यांना ओळखपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच बाजार समितीमधील बाजार निरीक्षक, सहायक उपनिरीक्षक तसेच सुरक्षारक्षकांसाठी ‘ड्रेस कोड’ प्रणाली लागू करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी जून महिन्यात कृषी व संलग्न यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. या वेळी शेतकऱ्यांसोबतच व्यापारी, हमाल तसेच बाजार समिती कर्मचाऱ्यांकरिता बाजार समित्यांच्या परिसरात जोखीम वाढल्याचे सांगण्यात आले. त्याची दखल घेत त्यांनी त्याच वेळी बाजार समित्यांमधील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणांचे निर्देश दिले होते. शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली होती.

संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील बाजार समितीमधील दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानंतरही बाजार समितीच्या परिसरात काही गोंधळ किंवा वादाची स्थिती निर्माण झाली, तर त्याला संबंधित बाजार समितीचे सचिव जबाबदार असतील, असेही त्यांनी या बैठकीत जाहीर केले होते.

या बैठकीची दखल घेत आता मध्य प्रदेश पणन मंडळाद्वारे (मंडी बोर्ड) बाजार समित्यांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाजार समित्यांच्या परिसरात असामाजिक तत्त्वे प्रवेश करणार नाहीत, याची जबाबदारी सचिवांवर असणार आहे.

शेतकरी व व्यापाऱ्यांना भयमुक्‍त वातावरणात व्यवहार करता यावे याकरिता हमाल तसेच मापारी यांना ओळखपत्र देण्यात यावे. बाजार निरीक्षक, सहायक उपनिरीक्षक तसेच सुरक्षारक्षकांना ड्रेस कोड लागू करावा. सीसीटीव्ही कॅमेरा, विद्युत व्यवस्थाकामी प्रभावी यंत्रणा असावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT