Hair Fall Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Hail Fall News : केस गळती बाधित गावांत ‘आयसीएमआर’ची तपासणी

Takkal Virus : शेगाव तालुक्यातील केस गळती बाधित गावांत मंगळवारी (ता.१४) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात दिल्ली आणि चेन्नई ‘आयसीएमआर’चे पथक दाखल झाले.

Team Agrowon

Buldana News : शेगाव तालुक्यातील केस गळती बाधित गावांत मंगळवारी (ता.१४) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात दिल्ली आणि चेन्नई ‘आयसीएमआर’चे पथक दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या चमूमधील तज्ज्ञांनी जिल्ह्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली.

त्यानंतर या पथकामधील शास्त्रज्ञांनी केस गळती भागातील बाधित रुग्णांशी संवाद साधून केस गळतीचे मूळ कारण शोधून प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली.

या विशेष पथकामध्ये डॉ. मनोज मुन्हेकर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी चेन्नई), डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ. सुमित अग्रवाल (आयसीएमआर, नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (आयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे), डॉ. राज तिवारी (संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ, भोपाळ), डॉ. सुचित कांबळे (आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) यांचा समावेश आहे.

आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नवी दिल्ली येथील प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्था आणि केंद्रीय होमिओ परिषदेच्या शास्त्रज्ञांची चमूदेखील शेगाव तालुक्यात दाखल झालेली आहे.

यामध्ये युनानी होमीओपॅथी आणि आयुर्वेदिक तज्ञांचा समावेश असून डॉ. हिंकल कौर, डॉ. प्रियंका सूर्यवंशी, डॉ. तेजस्विनी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केस गळती गावातील रुग्णांशी चर्चा करुन माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथीचे शास्त्रज्ञ केस गळती कारण शोधण्याचे काम करीत आहे.

केसगळती रुग्णांची संख्या पोचली १७८ वर

केस गळती रुग्णांच्या आकडेवारीनुसार शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे २३, कालवड २४, कठोरा २१, भोनगाव आठ, मच्छिंद्रखेड सहा, हिंगणा वैजिनाथ येथे पाच, घुई आठ, तरोडा कसबा १३, माटरगाव २१, पहुरजिरा ३२, निंबी १०, नांदुरा तालुक्यातील वाडी गावात सात असे एकूण १७८ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT