Aslam Abdul Shanedivan
सध्या लहान मुलांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केसांच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
केसांच्या विविध समस्यांवर बायोटिनयुक्त पदार्थ महत्वाची भूमीका पार पाडतात. तर यांचा आहारात समावेश केल्यास केसांच्या वाढीस मदत मिळते
अंड्यातील पिवळा बलक हा बायोटिनचा चांगला स्रोत असून जी केसांच्या निर्मितीत आणि वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
रताळ्यामध्ये देखील बायोटिनचे प्रमाण अधिक असून जे केस गळती कमी होण्यास मदत करते
पालक लोह, व्हिटॅमिन ए आणि सी आणि बायोटिनचा चांगला स्रोत असून पालक केसांच्या वाढीस मदत करते
फॅट्स, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असणारे नट्स केसांसह संपूर्ण आरोग्यासाठी चांगले असतात
बदामात व्हिटॅमिन बी ७ मोठ्या प्रमाणात असते. जे केस गळणे आणि स्प्लिट एंड्स होण्यापासून रोखण्यास मदत करतात. (Disclaimer : ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)