Cashew Tree Burnt Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Tree Burnt : मळगाव येथे आगीत काजूची शेकडो झाडे जळाली

Cashew Tree : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वणव्यात काजू, आंबा बागा जळण्याचे प्रकार वाढत असून सोमवारी (ता. ११) मळगाव (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत काजूची उत्पादनक्षम शेकडो झाडे जळाली.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वणव्यात काजू, आंबा बागा जळण्याचे प्रकार वाढत असून सोमवारी (ता. ११) मळगाव (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत काजूची उत्पादनक्षम शेकडो झाडे जळाली.

दरम्यान हरकुळ आणि बीडवाडी (ता. कणकवली) येथे लागलेल्या वणव्यात दोन घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी झाराप पत्रादेवी महामार्गानजीक असलेल्या मळगाव येथे वणवा लागला. माळरानावरील वाळलेले गवत आणि कडक ऊन यामुळे आगीचा भडका उडाला.

ही आग मळगाव येथील काजू बागांमध्ये पसरली. अवघ्या काही तासांत या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या काजू बागा जळाल्या. यामध्ये विलास राऊळ, सुरेश राऊळ, सुहास राऊळ, अरुण राऊळ यांच्या बागेतील उत्पादनक्षम काजूची शेकडो झाडे जळाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

कणकवली तालुक्यातील बीडवाडी परिसरात सोमवारी लागलेल्या आगीत बीडवाडीतील जनाबाई जंगले यांचे घर जळाले. घरातून पळताना जनाबाईदेखील जखमी झाल्या. त्यांच्या घरातील सर्व साहित्य खाक झाले असून त्यांचे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे.

याशिवाय कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अब्दुल करीम शहा यांच्या बंद घराला आग लागली. यात मोठे नुकसान झाले असून परिसरातील वणव्यामुळेच ही आग लागल्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Executive Editor of Agrowon: ‘ॲग्रोवन’च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव

Tribal Development: आदिवासींच्या विकासासाठी मत्स्य व्यवसायाला चालना

Land Measurement Irregularities: मोजणीत गैरव्यवहार केल्यास परवाना रद्द होणार

Summer Crop Sowing: उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग

Hingoli Turmeric Market: हिंगोलीमध्ये हळदीची २२८० क्विंटल आवक

SCROLL FOR NEXT