Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : नुकसानग्रस्त बागायतदारांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे

Team Agrowon

Sangli News : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांचे शंभर टक्के कर्ज माफ करा. द्राक्ष पीकविमा योजनेचे निकष बदला, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी रविवारी (ता. ३) जिल्ह्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कोल्हापूरचे नेते सावकार मादनाईक या वेळी त्यांच्या समवेत होते.

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ भागातील द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी या संकटात संपूर्ण आधार मिळायला हवा, अशी भूमिका मांडली. शेट्टी म्हणाले, की राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे.

त्याचबरोबर द्राक्ष पीकविमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे. त्यामुळे ती बदलयला हवी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे द्राक्ष बागायतारांनी संघटित होण्याची गरज आहे. राज्य सरकारने मदतीचा हात न दिल्यास रस्त्यावर उतरून न्याय देऊ.

या वेळी पोपट मोरे, संजय बेले, संजय खोलखुंबे, भरत चौगुले, नंदू नलवडे, श्रीधर उदगावे, बाळासाहेब सुरेश वसगडे, सुहास केरीमाने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. कोंगनोळी येथील सागर वावरे शेतकऱ्याने द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.

त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राजवर्धन घोरपडे, भूपाल पाटील, प्रा. एस. बी. भातमारे, गणपतराव साळुंखे, राजू पोतदार, बाळू पाटील, दीपक मगदूम, डॉ. कुडचे, शितल बोरगावे, शंतिनाथ लिंबेकाई उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT