PM Kusum Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Agriculture Pump : ‘सौर कृषिपंपा’साठी अर्जांचा पाऊस

Solar Pump Scheme : शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ‘महावितरण’ने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ हे धोरण स्वीकारले असून, यासाठी ‘कुसुम-ब’ ही योजना लागू केली.

Team Agrowon

Latur News : शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ‘महावितरण’ने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ हे धोरण स्वीकारले असून, यासाठी ‘कुसुम-ब’ ही योजना लागू केली. या योजनेसाठी लातूर परिमंडळातून तब्बल ६८ हजार ३०९ शेतकऱ्यांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

या अर्जदारांपैकी ‘महावितरण’ने ३९ हजार ६३४ अर्जदार शेतकऱ्यांना कोटेशन (लाभार्थी हिस्सा) भरण्याची विनंती दोन महिन्यांपूर्वी केली आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याने आपला लाभार्थी हिस्सा भरला नसल्याचे आढळून आले आहे. म्हणून संबंधित शेतकऱ्यांचा अर्ज रद्द करावा का, असा विचार महावितरण करीत आहे.

दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे. म्हणून ‘कुसुम-ब’ ही योजना लागू करण्यात आली. या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के, तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के लाभार्थी हिस्सा भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. यानुसार लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळात कुसुम-ब योजनेमधील ६८ हजार ३०९ प्राप्त अर्जदारांपैकी ३९ हजार ६३४ अर्जदार शेतकऱ्यांना महावितरणकडून ‘कोटेशन’ पाठविण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यातील आठ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर बीड जिल्ह्यातील २१ हजार १९६ आणि धाराशिव जिल्ह्यातील १० हजार १०७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही यापैकी एकाही शेतकऱ्याने आपल्या लाभार्थी हिश्श्याची रक्कम भरलेली नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे या योजनेत अधिकाधिक शेतकरी लाभ कसे घेतील, याकडे महावितरणचे लक्ष लागले आहे.

हिस्सा भरणाऱ्यांनाच सौर कृषिपंप

कुसुम-ब योजनेतील लातूर परिमंडळामधील ३९ हजार ६३४ शेतकऱ्यांना कोटेशन (लाभार्थी हिस्सा) पाठविला आहे. दोन महिन्यांचा कालावधी ओलांडला, तरी संबंधितांनी लाभार्थी रक्कम भरली नसल्याचे दिसून येत आहे. याच्याच जोडीला इतर इच्छुक अर्जदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

म्हणून याआधी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा तातडीने भरून घ्यावा. रक्कम त्वरित न भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. जे शेतकरी त्वरित लाभार्थी हिस्सा भरतील, त्यांनाच प्राधान्याने सौर कृषिपंपांचे वाटप केले जाणार आहे, असे महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT