Wild Boar Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Boar Rampage : शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Wild Animal Crop Damage : कारी येथील शिवारात सध्या रानडुकरांचा धुमाकूळ वाढला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Solapur News : कारी येथील शिवारात सध्या रानडुकरांचा धुमाकूळ वाढला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीत रानडुकरांच्या कळपांनी घुसून नुकसान केले आहे.

मागील हंगामात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यंदा नवीन आशा धरून शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु, जून महिन्यापासून झालेल्या अति पावसामुळे काही पिके हातून गेली. आताच्या हंगामातील हरभऱ्यासह अन्य पिकेही रानडुकरे उद्‌ध्वस्त करीत आहेत.

शेतकरी उमेश डोके यांनी मेहनतीने तीन एकर जमिनीत हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र रानडुकरांच्या कळपाने सलग पेरणी केलेले हरभऱ्याचे पीक पूर्णपणे उकरून फस्त केले. अक्षरशः जमिनीतील हरभरा फस्त करून पिकाची नासधूस करण्यात आली. यामुळे डोके यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

रानडुकरांच्या हल्ल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभागाने तातडीने मदत करावी व नुकसान भरपाई द्यावी. तसेच पुढील हंगामासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

शिवारात ठिकठिकाणी नासाडी

संपूर्ण शिवारात रानडुकरांचे कळप फिरत असून, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हरभऱ्यासह गहू, ज्वारी, मका आणि अन्य पिकांवरही रानडुकरांचा हल्ला होत आहे. या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

रानडुकरांच्या सततच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रानडुकरांवर नियंत्रण आणण्यासाठी बंदोबस्त करण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

याशिवाय शेतकऱ्यांनी शेतीचे संरक्षण करण्यासाठी सवलतीच्या दरात कुंपण पुरविण्याची मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत वनविभागाने प्रभावी उपाययोजना न केल्यास रानडुकरांचा त्रास अधिकच वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT