HTBT Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

HTBT Seed : ‘एचटीबीटी’चे उत्पादन गुजरातेत कारवाई महाराष्ट्रात का?

Illegal Seed Production : शेती प्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : अनधिकृत बियाण्याचे उत्पादन आणि विक्री गुजरातमधून होत आहे. त्यामुळे याच ठिकाणी उत्पादकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना ती न करता देशातील इतर भागांतील शेतकऱ्यांकडून बियाणे जप्त करून त्यांच्यावर होणारी पोलिस कारवाई अन्यायकारक आहे. परिणामी, ही कारवाई थांबवावी, अशी मागणी शेती प्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, अमेरिकेत संकरित बियाण्यांचा वापर केला जात नाही. त्या देशात सरळ वाणाचे बियाणे वापरले जाते. भारतातही अशाच प्रकारच्या बियाण्यांना प्रोत्साहन मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील खर्च कमी होणार आहे. परंतु ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे.

बियाणे कंपन्यांच्या दबावाखाली शेतकरी हित दुर्लक्षित केले जात आहे. यापूर्वी कापसात उपलब्ध असलेले बीजी-१ व बीजी- २ हे तंत्रज्ञान अमेरिकन कंपनी मोन्सॅटो (विद्यमान बायर) कंपनीकडून घेण्यात आले. आता नव्याने याच कंपनीने राउंडअप रेडी तंत्रज्ञान विकसित केले आहे. हा जीन टाकत एचटीबीटी तयार केले जाते. या जीनचा समावेश असलेल्या पिकावर तणनाशकाची थेट फवारणी करता येते.

यामुळे निंदनावरील मजुरी खर्चात बचत होत असल्याने साहजिकच या तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. परंतु हेच तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक असल्याची अफवा देखील पसरविली जात आहे. सध्या अनधिकृत एचटीबीटीचे उत्पादन गुजरात राज्यात होत असल्याचे सर्वश्रुत आहे. या संदर्भाने १७ जुलै २०१९ मध्ये पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीत कारवाईची मागणी करण्यात आली होती.

पंतप्रधान कार्यालयाने गुजरात सरकारला पत्र लिहीत कारवाईचे सांगितले. त्याची दखल घेत ३० सप्टेंबर २०२० मध्ये गुजरात सरकारने अशा प्रकरणात कारवाईचे आश्‍वासन देणारे पत्र पाठविले होते. मात्र त्यानंतरही महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांत एचटीबीटीचा पुरवठा कसा होत आहे?

गुजरातमधील एचटीबीटी बीजोत्पादकांवर कारवाई अपेक्षित असताना त्याऐवजी त्या भागातून बियाणे आणणाऱ्या किंवा पुरवठा होणाऱ्या व्यक्‍तींवर कारवाई करून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे, हे प्रकार थांबवावे, अशी मागणी देखील श्री. जावंधिया यांनी केली आहे.

सरळ वाणाचे बियाणे विक्री

संकरितऐवजी सरळ वाणाच्या बियाण्याची विक्री एचटीबीटी म्हणून केली जात आहे. हे बियाणे ४० रुपये किलोला मिळत असताना त्याची विक्री २०० रुपयांनी होत असल्याचा आरोप देखील विजय जावंधिया यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT