Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Crisis: किती जीव गेले म्हणजे सरकार जागे होणार?

Vidarbha Farmer Issue: शेतकरी या राज्याचा आत्मा आहे. मात्र आत्माच व्याकूळ असेल, तर सत्ता प्रमुखाला हळहळ वाटणे गरजेचे वाटते. पण असे कुठेच दिसत नाही.

Team Agrowon

Indian Agriculture: राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे, यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांत अकोला जिल्ह्यात किमान ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्‍चिम विदर्भ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या ४९ वर्षांत ४० हजारांवर आत्महत्या झाल्या आहेत. यावर मंथन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणे फार गरजेचे वाटते. शेतकरी या राज्याचा आत्मा आहे.

मात्र आत्माच व्याकूळ असेल तर सत्ता प्रमुखाला हळहळ वाटणे गरजेचे वाटते. पण असे कुठेच दिसत नाही. उलट रोज आपले कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नैराश्याची भावना वाढते आहे. त्यांच्यामध्ये असंतोष वाढत चालला आहे.

आज सोयाबीनला चार हजार व कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे. शेती उत्पादनामध्ये खर्च अधिक वाढला आहे. याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तूर्तास तरी शेतकरी कर्जमुक्ती हा एक उपाय आहे. पण तोही कायमस्वरूपी नाही.

उत्पादन वाढीसोबत त्याचे उत्पन्न कसे वाढेल, हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा असतो. पण त्याकडे सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्फ देवा भाऊ आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा व राज्यातील तमाम शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा द्यावा ही कळकळीची विनंती आहे.

उद्या जर का हा वणवा पेटला, तर सरकारसाठी ते अडचणीचे ठरणार आहे, याची जाणीव गृहमंत्री व मुख्यमंत्री या नात्याने आपणास निश्‍चितच असेल. पण शेतकऱ्याच्या बाबतीत आपले मौनव्रत हे काही बरे नाही, असे मनापासून वाटते.
धनंजय मिश्रा, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT