Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांद्याचे बाजारभाव आणखी किती दिवस टिकतील? बाजारातील आवक कमीच

Onion Update : देशातील बाजारात सध्या कांद्याच्या भावात काहिसे चढ उतार सुरु आहेत. मात्र कांद्याची सरासरी दरपातळी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील बाजारात सध्या कांद्याच्या भावात काहिसे चढ उतार सुरु आहेत. मात्र कांद्याची सरासरी दरपातळी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यातच खरिपातील कांद्याची आवक अजून वाढलेली नाही. तर लेट खरिपातील लागवड घटलेली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव आणखी काही आठवडे टिकण्याची शक्यता आहे.

देशातील बाजारात कांद्याचे भाव वाढण्याला प्रामुख्याने कमी पुरवठा हे कारण आहे. सध्या देशात उपलब्ध कांद्याचे प्रमाण खूपच कमी आहे. सध्या बाजारातील कांदा आवकेचे गणित रब्बी आणि खरिप असे असते. यंदा खरिपातील कांदा लागवड वाढली. मात्र पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले. तसेच लेट खरिपातील कांदा लागवडही घटली आहे

खरिपातील कांदा लागवड साधारणतः जून आणि जुलै महिन्यात होत असते. तर काढणी ऑक्टोबरपासून सुरु होते. मात्र यंदा जून आणि जुलैत रोप लागणीसाठी अनेक भागात उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे लागवडी उशीरा सुरु झाल्या. तर लेट खरिपाची लागवड सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होते. तर काढणी डिसेंबरनंतर होते. तर रब्बीची लागवड डिसेंबरनंतर होते आणि काढणी मार्चपासून सुरु होते.

कांदा लागवड

गेल्या हंगामात खरिपात २ लाख ८५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. मात्र यंदा लागवड वाढून ३ लाख ८२ हजार हेक्टरवर पोचली. म्हणजेच लागवड क्षेत्र जवळपास १ लाख हेक्टरने वाढले होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले. खरिपातील लगावड वाढली मात्र लेट खरिपाची लागवड कमी झाली. गेल्या हंगामात लेट खरिपात १ लाख ६६ हजार हेक्टरवर लेट खरिपाची लागवड होती. मात्र यंदाची लागवड ५५ हजार हेक्टरवर झाली.

सध्या आवक कमी

देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून कांद्याची आवक कमी झाली. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या रब्बी हंगमात घटलेले कांदा उत्पादन. त्यामुळे सध्या रब्बीतील कांदा उपलब्धता कमी आहे. तर खरिपातील कांदा उशीरा येत आहे. यामुळे बाजारात सध्या कांद्याची उपलब्धता कमी आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये खरिपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल, असे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT