Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : बाजारात सध्या सोयाबीनची आवक कशी सुरु आहे?

Market Update : सोयाबीनला देशातील बहुतांशी बाजारांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे.

Team Agrowon

Market Bulletin : सोयाबीनच्या दरातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचे भाव आजही हमीभावाच्या दरम्यान आहेत. सोयाबीनला देशातील बहुतांशी बाजारांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक जवळपास १ लाख ७० हजार क्विंटलच्या दरम्यान आहे.

देशातील बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावात आहेत. बाजारभाव कमी झाल्यानंत बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाली. पण आजही आवक अपेक्षेप्रमाणे असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले. सोयाबीन बाजारात पुढील दोन आठवडे भावात १०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज आहे. 

देशातील बहुतांशी बाजारात कापूस आजही हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक मात्र टिकून आहे. याचाही दबाव कापूस बाजारावर दिसून येत आहे. सध्या कापसाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपये भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस भाव दबावात आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून येत आहे. देशातील बाजारात मात्र कापूस भावावर प्रामुख्याने आवकेचा दबाव दिसून येत आहे. हा दबाव आणखी एक ते दीड महिना राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळदीचे भाव पुन्हा एकदा स्थिरावले आहेत. मध्यंतरी नफावसुलीसाठी व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांची वि्क्री वाढली होती. त्यामुळे हळदीच्या भावावरही दबाव आला होता. हळदीची बाजारातील आवक मागील आठवड्यापासून पुन्हा मर्यादीत झालेली दिसते. सध्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजारांचा भाव मिळत आहे.

तर वायद्यांमध्ये १४ हजार १५ हजारांचा भाव मिळत आहे. यंदाही घटलेली लागवड, प्रतिकूल हवामान आणि पाण्याचा ताण यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवा माल बाजारात सुरु होत आहे. त्यामुळे भाव नरमले आहेत. पण २०२४ मध्येही हळद भाव खाण्याची शक्यता असल्याचे बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.

टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचा बाजार काहीसा स्थिरावलेला दिसतो. बाजारातील टोमॅटोची आवक चांगली सुरु आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

बाजारातील टोमॅटो आवक आणखी काही दिवस या पातळीदरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे आणखी काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबावही कायम दिसू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.

केळीच्या भावातील सुधारणा आजही टिकून होती. केळीचा भाव गेल्या आठवडाभरापासून १०० रुपयांनी वाढलेला आहे. राज्यात सध्या केळीला सरासरी १ हजार ९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. निर्यातीच्या केळीचा हा भाव आहे. तर दर्जाप्रमाणे १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

दर्जेदार केळीला उत्तर भारतातील बाजारातून उठाव मिळत आहे. राज्यातही केळीला चांगली मागणी येत आहे. दुसरीकडे दर्जेदार केळीची उपलब्धता कमी दिसून येते. पुढील काळात आणखी काही आठवडे ही परिस्थिती राहू शकते. त्यामुळे केळीच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT