Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : दोन हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना किट

Latest Agriculture News : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे.

Team Agrowon

Mumbai News : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. मुंडे यांच्या सूचनेनुसार २ हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्याचे किटच वितरण केले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार कृषिमंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला आहे. ‘शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन २०२३’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे. परळी येथे नुकत्याच एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कीट देण्यात आले.

या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणे, नॅनो युरिया, सूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध कीटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळसाठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित विविध वस्तूंचा समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील २ हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना हे किट वितरित करण्यात येत आहे. या उपक्रमातून सर्व जिल्ह्यांत किटचे वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा कोणताही निधी वापरण्यात आलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT