Horticulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Day : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘हॉर्टीकल्पर डे’चा अभिनव उपक्रम

PDKV Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मागील वर्षापासून अभिनव उपक्रम म्हणून हॉर्टीकल्पर डे आयोजित केला जात आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मागील वर्षापासून अभिनव उपक्रम म्हणून हॉर्टीकल्पर डे आयोजित केला जात आहे. शुक्रवारी (ता. १४) या डेचे उद्‍घाटन होणार आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर बहरलेल्या फळ, भाजीपाला, फूलवर्गीय पिकांची पाहणी करावीस, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्‍घाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम होत आहे. जिरायती शेती पद्धतीचा वापर असलेल्या विदर्भात शेती शाश्वत आणि शेतकऱ्यांची भरभराट होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. शेतातून प्रयोगशाळेकडे या तत्त्वानुसार विद्यापीठाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पुढे नेला जात आहे.

विदर्भातील वातावरणात उत्पादित होणारे व बाजारपेठेत चांगली मागणी असणारी फळे, भाजीपाला व फूल पिकांचे जिवंत प्रात्यक्षिके तयार करण्यात आले आहे. हे सर्व पाहण्याची व शास्त्रज्ञांकडून लागवड तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आज उद्‍घाटन

विद्यापीठाने आयोजित केलेल्या या हॉर्टीकल्चर डेच्या उद्‍घाटनाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे पूर्व उपमहासंचालक (उद्यानविद्या) डॉ. एच. पी. सिंग राहतील. तर कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्ष असतील.

या वेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रावसाहेब भागडे, उद्यानविद्या आयुक्त डॉ. प्रभात कुमार, हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, बारामती कृषी विकास संस्थेचे राजेंद्र पवार, शुब्रतो रॉय, कैलास मोते यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य, विद्यापीठाचे विभाग प्रमुख उपस्थित राहतील.

काय मिळणार बघायला

२१ विविध भाजीपाला पिकांचे ३४ वाण २० एकर क्षेत्रावर तसेच १७ विविध फळ पिकांचे ३४ वाण २०० एकर क्षेत्रावर आणि २३ विविध फुलपिकांचे ३१५ शोभिवंत प्रकार १० एकर क्षेत्रावर असे एकूण २३० एकर क्षेत्रावर उद्यानविद्या विषयक ५८ पिकांचे ३८३ पीक प्रात्यक्षिके सर्व तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष पाहणीस उपलब्ध करून दिली आहेत. या दोन दिवसीय उपक्रमात उद्यानविद्या विषयक शिवार फेरी व चर्चासत्र होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT