Sugarcane Labor  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊसतोड मजुरांना परतीचे वेध

Sugarcane Labor : उन्हाचा वाढलेला कडाका आणि सलग तीन महिने काम करून कंटाळल्याने गळीत हंगाम कधी एकदा संपतो आणि गावी जातो, याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम विधानसभा निवडणुकांमुळे उशिरा सुरू झाल्याने थोडासा लांबला. कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने नुकतेच बंद झालेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद होतील.

गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. उन्हाचा वाढलेला कडाका आणि सलग तीन महिने काम करून कंटाळल्याने गळीत हंगाम कधी एकदा संपतो आणि गावी जातो, याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दरवर्षी ऊसतोडणीसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अहमदनगर, बीड, सांगोला, जत, परभणी, विजापूर, लातूर, जालना, वाशीम, यवतमाळसह अन्य भागातून मजूर येतात. ते वाहनासह ऊस तोडणीसाठी पती-पत्नी मिळून एक कोयता या हिशेबाने १० ते १५ कोयत्यांच्या टोळीचा करार करतात.

वाहनमालक हंगामापूर्वी प्रतिकोयता सुमारे एक लाखापासून दोन लाखांपर्यंत उचलीची रक्कम देतात. काही तोडणी मजुरांची कुटुंबे कारखाना कार्यस्थळावर झोपड्या बांधून राहतात, तर काहींना ट्रक, ट्रॅक्टरच्या तोडणी कार्यक्रमानुसार गावोगावी झोपड्या बांधून फिरावे लागते. सध्या उन्हाचा कडाका सुरू झाला आहे.

त्यातच खोडवा, निडवा उसाचा तोडणी कार्यक्रम सुरू असल्यामुळे उसाची भरती होत नाही. चार महिने रात्रंदिवस ऊसतोडणी करून कामगार कंटाळले आहेत. पाच-सहा महिन्यांनंतर गावी जाण्याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

ऊस जाळून तोडणी

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वच कारखाने बंद होतील. अजूनही काही ठिकाणी ऊसतोड सुरू आहे. उन्हाचा कडाका आणि तोडणीसाठी मजूर नसल्याने शेतकरी ऊस जाळून स्वतःच ऊस कारखान्याला पाठवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Textile Park: यवतमाळ जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्कला मिळेना गती

Agrowon FPC Conference: नव्या दिशांवर झाले विचारमंथन

ED Files Chargesheet: रिलायन्स पॉवर, उपकंपन्यांविरुद्ध आरोपपत्र

Sugar Industry: दौंडमध्ये कारखान्यांचे ऊसदराबाबत मौनच

Custom Structure: पुढचे लक्ष्य आता सीमाशुल्क ‘शुद्धीकरणा’चे : निर्मला सीतारामन

SCROLL FOR NEXT