Hivare Bajar Development Agrowon
ॲग्रो विशेष

Hivare Bajar Development : हिवरेबाजारच्या यशाचे अधिकाऱ्यांनी जाणले गणित

Rural Development : आदर्श गाव हिवरेबाजार गावाने तीस-पस्तीस वर्षांत केलेल्या कामातून मिळविलेले यश प्रेरणादायी आहे.

Team Agrowon

Nagar News : आदर्श गाव हिवरेबाजार गावाने तीस-पस्तीस वर्षांत केलेल्या कामातून मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. गावपातळीवर काम करताना या यशाचे गणित काय आहे, याची माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात मंत्रालयात उपसचिव व सहायक सचिवांनी बुधवारी (ता. २) हिवरेबाजार परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांशी संवाद साधला.

नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजार गावांना श्रमदान, लोकसहभाग आणि विविध उपक्रमातून आपली ओळख निर्माण केली आहे. देशात आणि जगात नावलौकीक असलेल्या हिवरेबाजारमध्ये सातत्याने सरकारी पातळीवरील अनेक प्रशिक्षणेही होतात.

पुणे येथील यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्रात २३ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले होते. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात मंत्रालयात उपसचिव व सहायक सचिव प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

प्रशिक्षण काळातील एक दिवसाच्या प्रक्षेत्र भेटीसाठी हिवरेबाजार शिवाराची निवड केली. बुधवारी (ता. २) प्रशिक्षणातील उपसचिव व सहायक सचिव मिळून सुमारे पस्तीस अधिकाऱ्यांनी हिवरेबाजार परिसराला भेट देऊन पाहणी करत लोकांशी संवाद साधला.

गावात विविध कामे उत्कृष्ट दर्जाची

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजार येथे १९८९ पासून शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जलसंधारण व वनसंवर्धन कामे, पशुधन विकास, पीकपद्धतीत बदल त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा प्रभावी वापर, रस्ते यासह इतर विविध कामे अतिशय उत्कृष्ट दर्जाची झालेली आहेत, असे प्रक्षेत्र भेटीत अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marigold Flower Rate : लाल-पिवळ्या झेंडूचा भाव वधारला

Crop Damage Survey Issue : पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

SCROLL FOR NEXT