Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पूर्व विदर्भ, कोकणात पावसाच्या जोरदार सरी

Rain News : पूर्व विदर्भासह कोकणात शुक्रवारी (ता. ९) मध्यम पाऊस झाला. राज्यातील इतर भागात पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पूर्व विदर्भासह कोकणात शुक्रवारी (ता. ९) मध्यम पाऊस झाला. राज्यातील इतर भागात पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी हलका पाऊस झाला. शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ठाणे जिल्ह्यातील अंगाव येथे ७२ मिलिमीटर पाऊस पडला. पूर्व विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस पडला. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतील वाढ कायम आहे.

कोकणातील सिंधुदुर्गमधील सावंतवाडी, बांदा, मडुरा मंडलांत ४१, तर शिरोडा ४८, कुडाळ ४७ येथे मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सर्वत्र जोरदार सरी झाल्या. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

ठाणेमधील डिघशी मंडलात ३६ मिलिमीटर, तर शहापूर, खर्डी, किनहवळी, डोळखांब येथे ४२ मिलिमीटर पाऊस झाला. रायगडमधील महाड, नाटे, तुडली, माणगाव येथे ३८, कोलाड येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला. कोकणात महिनाभरापासून सतत जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील भातपिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांतील पाणीपातळी काहीशी कमी झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. तर मावळातील कार्ला येथे ३६, लोणावळ्यामध्ये ३३ मिलिमीटर पाऊस पडला. खानदेश, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहिले.

मराठवाड्यात पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. बीडमधील पाटोदा येथे ३२ मिलिमीटर, तर दासखेड ३८, तेरळा ३९, लातूरमधील घाटेगाव २३, चिंचोली येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात मंधाळ, पाचखेडी मंडलांत २६ मिलिमीटर पाऊस पडला.

तर भंडारा जिल्ह्यातील बारव्हा मंडलात २१, लाखंदूर, मासाळ, पालंदूर २५, गोंदियातील नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव ३७, बोधगाव देवी २८, महागाव, केशोरी, घोथनगाव २७, चंद्रपूरमधील मिढाळा येथे ३५, तर बह्मपुरी, अन्हेर, गांगळवाडी, चौगण, मेंडकी, नागभिड, मेंढा मंडलांत हलक्या सरी पडल्या. गडचिरोलीतील पिसेवढथा येथे ५९, येवळी ४७, कुरखेडा ३९, काढोली ४९, माळेवाडा ४०, वैरागड २८, धानोरा ४१ मिलिमीटर पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Farm Loan Waiver: तीस जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री भरणे

SCROLL FOR NEXT