Rain News  Agrowon
ॲग्रो विशेष

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

Sudhagad Rainfall : शेतात पाणी साचले असून, संपूर्ण तालुक्‍यात आतापर्यंत केवळ ७२४ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्‍यामुळे उत्‍पादन घटण्याची शक्‍यता आहे.

Team Agrowon

Pali News : सुधागड तालुक्‍यात मेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.शेतात पाणी साचले असून, संपूर्ण तालुक्‍यात आतापर्यंत केवळ ७२४ हेक्टरवरच पेरणी झाली आहे.

त्‍यामुळे उत्‍पादन घटण्याची शक्‍यता आहे. सध्‍या पावसाचा जोर कमी झाल्‍याने भात रोपे बनवण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण भातलागवडीखालील क्षेत्र २८१६.९३ हेक्टर असून, सध्या केवळ २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे,

तर नाचणीची लागवड १७३.४० हेक्टरवर करण्यात येत असून, आतापर्यंत १३.५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वरीची पेरणीही ६.६४ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे, तर गतवर्षी ५०.७० हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. महागाव, चंदरगाव व हातोंड या ठिकाणी काही प्रमाणात लावणी सुरू आहे.

भातपिकाबरोबरच फळबागा, भाजीपाला लागवडीलाही फटका बसला आहे. नव्याने पेरणी केलेल्या पिकाची नासाडी झाली आहे. त्‍यामुळे ओला दुष्‍काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीकडून तहसीलदारांना देण्यात आले आहे.

घरातच तयार करा भात रोपे

पावसाने अजून उसंत न दिल्याने भातशेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. घराच्या परिसरात जागा असेल तिथे प्लॅस्टिकची ताडपत्री टाकून रोपे तयार करू शकता तसेच छोटी नर्सरी तयार करून भात रोपे तयार करता येतील. ही रोपे नंतर भात लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, अशी माहिती सुधागड तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT