Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Nagpur Rain Update : गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून भंडारा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भातील बहुतांश जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून भंडारा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने खंड दिला होता. परिणामी शेतकऱ्यांसह साऱ्यांचीच चिंता वाढली होती. पावसाअभावी काही भागात दुबार पेरणी करावी लागेल की काय ? असे चित्र निर्माण झाले होते. अकोला, अमरावती, वाशीम जिल्हयात पावसाअभावी पिके सुकण्याच्या स्थिती होती.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने हा पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरला आहे. दरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया जिल्हयात अनुक्रमे ७७ आणि ७९.४ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. पावसाच्या परिणामी गडचिरोली जिल्हयात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. गडचिरोली जिल्हयात सिरोंचा असरअली रस्ता, अहेरी-वटरा, कुरखेडा-वैरागड, कढोली-उराडी, तळेगाव-पळसगड, मालेवाडा-खोब्र्रामेंढा अशा सहा मार्गावरील वाहतूक बंद आहे. भंडारा जिल्हयात देखील पुरामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.

त्यामध्ये भंडारा ते कारधा, खमारी नाला, साकोली तालुक्‍यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराटी ते चीचगाव, नेहारवानी ते कटनधरा, लाखनी तालुक्‍यात मिरेगाव ते सोनमाळा या रस्त्यांचा समावेश आहे. भुमीता केवट (रा. मोहगाटा, साकोली, भंडारा) यांचा शेळ्याचा गोठा अतीवृष्टीमुळे कोसळल्याने दोन शेळ्या व एक बोकड ठार झाला.

जिल्हानिहाय पाऊस (मिमिमध्ये)

अकोला १०.१

अमरावती २७.४

भंडारा ५

बुलडाणा १२.२

ब्रम्हपूरी ४१.८

चंद्रपूर ३३

गडचिरोली ७७

गोंदिया ७९.४

नागपूर १८.२

वर्धा १५.४

वाशीम २२.८

यवतमाळ ४०.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र

Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची किंमत निश्चित

Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक

Pulses Processing Subsidy: कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी २५ लाखांचे अनुदान

SCROLL FOR NEXT