Rain News  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

Sindhudurg Rainfall : अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ आंबेडकरनगरमधील दहा घरांना पुराच्या पाण्याने वेढले असून तेथील ३५ जणांना सुरक्षित स्थळही हलविले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कुडाळ आंबेडकरनगरमधील दहा घरांना पुराच्या पाण्याने वेढले असून तेथील ३५ जणांना सुरक्षित स्थळही हलविले आहे. जोरदार वाऱ्यामुळे वितरणचे नुकसान झाले असून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक मार्गावर पुराचे पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. दुपारनतंर पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे भंगसाळ नदीला पूर आला.

कुडाळात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती होती. कुडाळ तालुक्यातील आंबेडकरनगर येथील दहा घरांना पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.स्थानिक आणि प्रशासनाने आंबेडकरनगरमधील ३५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.

दरम्यान शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अगोदरच दुथडी भरून वाहत असलेल्या नद्यांच्या पाणीपातळीत अधिकच वाढ झाली आहे. तिलारी, गडनदी इशाऱ्या पातळीनजीक पोहोचल्या आहेत.अनेक भागातील वीजखांब आणि वीजवाहिन्यांवर झाडे कोसळली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस

देवगड ः ३०मिमी, मालवण ः ४४ मिमी, सावंतवाडी ः १३० मिमी, वेंगुर्ला ः ७८ मिमी, कणकवली ः ८५ मिमी, कुडाळ ः ९८ मिमी, वैभववाडी ः ४६ मिमी, दोडामार्ग ः ५६ मिमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Egg Rate: अंडीदर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

Agrowon Exhibition 2026: शेतकऱ्यांची मांदियाळी एकवटली!

Onion Rate: कांद्याला १८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर

Vidarbha Irriagation Project: विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे

Winter Weather Forecast: तापमानात चढ-उतार शक्य; गारठा कायम

SCROLL FOR NEXT