Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Heavy Rain : पावसाने दुष्काळी तालुक्यांना झोडपले

Monsoon Rain Update : माण, फलटण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांना रविवारी (ता. २५) पावसाने झोडपून काढले आहे. इतर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : माण, फलटण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांना रविवारी (ता. २५) पावसाने झोडपून काढले आहे. इतर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ३५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माण तालुक्यातील आंधळी तर फलटण तालुक्यातील बाणगंगा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाली आहे. सोमवारी पावसाची रिपरिप सुरू होती.

सातारा, कऱ्हाड, वाई, खंडाळा तालुक्यांत पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. फलटण आणि माण तालुक्यांत याच पावसाने थैमान घातले आहे. ढगफुटीसदृश झालेल्या जनजीवन विस्कळित झाले आहे. माण तालुक्यातील आंधळी तर फलटण तालुक्यातील बाणगंगा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाले असून माणगंगा व बाणगंगा नदीला पूर आला आहे.

काही ठिकाणी शेती पिकांसह खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील खडकी, इंजबाव, पर्यंती, संभूखेड, भाटकी, हवालदारवाडी, कासारवाडी, मासाळवाडी, कारखेल, धुळदेव आदी गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. खडकी (तुपेवाडी) येथील सूर्यवंशी शेतशिवारातील पाझर तलाव भरून वाहू लागले.

आसू येथे नीरा नदीवरील नीरा-भीमा स्थैर्यीकरणाचा बंधारा बांधण्यात आला आहे. भाडळी बुद्रुक येथे वस्तीमध्ये पाणी शिरले. तिरकवाडी येथील रत्नमाला विष्णू काळुखे यांच्या शेतातून पुराचे पाणी वाहत जाऊन शेताचे मोठे नुकसान झाले आहे. खुंटे हनुमान नगरमधील सुमारे २८ कुटुंबांची अन्य ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

वाठार निंबाळकर येथे गणेश गोरखनाथ मुळीक यांच्या घरावर झाड पडले. तरडगाव येथील नंदकुमार भंडलकर यांच्या घराची भिंत पडली असून, त्यात एका शेळीचा मृत्यू झाला आहे. वाघोशी येथील विठ्ठल भागू शिंदे यांची घराची भिंत पडली आहे. कापशी येथील संतोष जाधव यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

जिंती (ता. फलटण) येथे नानासाहेब लोखंडे यांची गाय मृत झाली आहे. टाकळवाडे येथील किसन शिंदे यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील पाच पोती गहू, हरभरा, ज्वारी पाण्यात बुडाल्याने नुकसान झाले.

अंकुश खांडेकर यांचा ६० पोती कांदा ओढ्याच्या पुरात भिजून नुकसान झाले आहे. तरडगाव, फलटण, विडणी, बरड या चारही कृषी मंडलांतील एकूण बाधित क्षेत्र १२७ हेक्टर आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crop Fire: शॉर्टसर्किटमुळे १५ एकर ऊस जळून खाक

Raigad Irrigation Projects: सिंचन प्रकल्प कागदावरच

Water Extraction Ban: कृष्णा, उरमोडी नदीवरील पाणी उपशावर बंदीचे आदेश

Farm Loan Waiver: कर्जखात्यांची तपासणी पूर्ण, आता कर्जमाफीची प्रतीक्षा

Illegal HTBT Cotton Seeds: संशयास्पद कापूस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT