Agriculture Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Damage : मुसळधार पावसाने पेरणीपूर्वीच शेतीचे नुकसान

Monsoon Rain : उमरगा तालुक्यात पंधरा दिवसापासून दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. या दमदार पावसाने शिवारात सखल भागात पाणी साठले असून या पावसाने बेन्नीतुरा नदीसह परिसरातील नदी, नाले वाहते झाले आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामे थांबली असतानाच पाऊस थांबता थांबत नसल्याची स्थिती आहे. गुरुवारी (ता. २९) रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. यात उमरगा व लोहरा तालुक्यात मोठा पाऊस झाला. यात उमरगा तालुक्यातील दगडधानोरासह तलाव तुडूंब भरले.

शेतशिवारातील बांध व बंधारे फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने बेन्नीतुरा नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाकडून नदीत बांधण्यात आलेला सिमेंट बांधारा वाहून गेला आहे. मांजरा धरणाच्या पातळीत चार दिवसात पाणीसाठ्यात आठ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली असून धरणात सध्या २६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

उमरगा तालुक्यात पंधरा दिवसापासून दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. या दमदार पावसाने शिवारात सखल भागात पाणी साठले असून या पावसाने बेन्नीतुरा नदीसह परिसरातील नदी, नाले वाहते झाले आहेत. तालुक्यात गुरुवारी रात्री दहा ते बारा काळात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस कमी अधिक प्रमाणात शुक्रवारी (ता.३०) पहाटे पर्यंत होता.

या मुसळधार पावसाने शिवारात ठीक ठिकाणी बांध बंधारे फुटून शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रमाण पाहता आर्थिक फटक्याबरोबरच हे बांध बंधारे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस लागतील. या पावसाने पुन्हा बेन्नीतुरा नदीसह परिसरातील नदी, नाले पात्र भरून वाहिली आहेत.

यावेळी बेन्नीतुरा नदीला आलेल्या पुरामुळे भूकंपापर्वीच्या जेवळीजवळ जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडून २००५ मध्ये बांधण्यात आलेले सिमेंट बंधारा वाहून गेला आहे. दरम्यान बंधारा दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता ए. ए. गोरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Farmer Schemes: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार कमी कागदपत्रे ! डीबीटी पोर्टलवरील २१ योजनांचे डिजिटल सुसूत्रीकरण

Marigold Price: दसऱ्यात झेंडूचा रंग पडला फिका; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा!

Maharashtra Rain Prediction: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत १५ जागा बिनविरोध, ६ जागांसाठी १३ जण रिंगणात, पडळकर विरुद्ध पवार लढत

Market Committee Rule: बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांच्या चढ-उतारावर बंदी; माथाडी कामगारांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT