Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Kerala Rain Update : केरळच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा

Kerala Monsoon News : केरळच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने तडाखा दिला असून राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे.

Team Agrowon

Kerala News : केरळच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने तडाखा दिला असून राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. विशेषत: राज्याची राजधानी तिरूअनंतपूरममध्ये अनेक भाग जलमय झाले.

तिरुअनंतपूरम जिल्ह्यात शनिवारपासून (ता. १४) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले तसेच सखल भागही जलमय झाले.

तिरूअनंतपूरमचे उपनगर असलेल्या काझाकुट्टममधील टेक्नोपार्कमध्ये घरात पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे, इतर भागांतही मोटारी पावसाच्या पाण्यात बुडाल्याने नागरिकांची नौकांच्या सहाय्याने सुटकाच करण्यात आली.

केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवकुट्टी यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. त्यानंतर, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की तिरूअनंतपूरम शहरामध्ये १०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

त्यामुळे, अनेक भाग जलमय होऊन पूरस्थिती निर्माण झाली. राज्याचे वाहतूक मंत्री ॲंटोनी राजू, नागरी पुरवठा मंत्री जी.आर.अनिल हेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तिरूअनंतपूरम जिल्ह्यात १७ मदत छावण्यांत ५७२ नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्याचे महसूलमंत्री के.रंजन यांनीही पूरग्रस्त दौरा केल्याची माहिती फेसबुक पोस्टद्वारे दिली.

तिरुअनंतपूरममध्ये शनिवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भाग जलमय झाले. समुद्राच्या भरतीमुळे ही परिस्थिती आणखी चिघळली. जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत व बचावकार्य राबविले जात आहे. पूरग्रस्तांना सर्व प्रकारची आवश्यक मदत पुरविली जात आहे.
- व्ही. शिवकुट्टी, शिक्षणमंत्री, केरळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या हालचाली

Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

Farmer Loan Waiver : व्याजमाफी करून मुदलाचे हप्ते करून द्या

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

SCROLL FOR NEXT