Keral Green Cover Project : देवभूमीतील मंदिरं करणार हरित क्रांतीचा चमत्कार

Team Agrowon

देवभूमी

केरळमधील आल्हाददायक समुद्रकिनारे, सुंदर बॅकवॉटर्स, देखणी मंदिरं आणि दिमाखदार राजवाडे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे या राज्याला देवभूमी असे म्हटले जाते

Kerala temples | agrowon

मंदिरात उत्सव

केरळ राज्य सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव साजरे करण्यात देखील प्रसिध्द आहे. येथील अनेक मंदिरांमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात.

Kerala temples | agrowon

मंदिरात करोडोंचा खजिना

काही वर्षांपूर्वी तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्‍वामी मंदिरात करोडो रुपयांचा खजिना मिळाला होता. केरळमधील अनेक मंदिरांमध्ये मोठा खजिना आहे.

Kerala temples | agrowon

केरळ सरकारचे एक पाऊल

वैश्विक तापमानवाढीच्या संकटाचा सामना करण्याबरोबरच त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केरळ सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Kerala temples | agrowon

महत्वाकांक्षी प्रकल्प

केरळमधील ५ देवस्थान मंडळांच्या नियंत्रणाखाली असलेल्या तब्बल ३ हजार मंदिरांच्या हरित क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Kerala temples | agrowon

जलस्रोतांचे जतन

या प्रकल्पांतर्गत पारंपरिक जलस्रोतांचे जतन केले जाणार आहे. तसेच मंदिराच्या आवारातील दुर्लक्षित तळी आणि उपवनांचे देखील संरक्षण करण्यात येईल.

Kerala temples | agrowon

देवनकानम चारूहरितम

या प्रकल्पाला ‘देवनकानम चारूहरितम’ (देवाचे सुंदर हरित निवासस्थान) असे नाव देण्यात आले

Kerala temples | agrowon

पर्यावरण रक्षणाचे प्रतीक

राज्यातील मंदिरांना पर्यावरण रक्षणाचे प्रतीक बनविले जाणार असून त्रावणकोर देवस्थान मंडळाप्रमाणेच, कोची, मालाबार, गुरुवायूर आणि कुडलमनिक्कम देवस्थान मंडळाने हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Kerala temples | agrowon
monsoon season | agrowon
आणखी पहा