Maharashtra Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : बीडमध्ये पावसाचा जोर अधिक

Monsoon Update : मराठवाड्यातील जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंत झालेल्या २४ तासांत पावसाचा जोर बीड जिल्ह्यात अधिक दिसून आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंत झालेल्या २४ तासांत पावसाचा जोर बीड जिल्ह्यात अधिक दिसून आला. या जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुलनेने पावसाचा जोर अल्प होता.

बीड जिल्ह्यातील एकूण ६३ पैकी ५५ मंडलांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील लिंबागणेश मंडलात ७४ मिलिमीटर तर घाटनांदूर मंडलात ६९ मिलिमीटर इतका अतिवृष्टी रूपात पाऊस झाला. जिल्ह्यातील बीड तालुक्यात सरासरी २४.३ मिलिमीटर, पाटोदा ३१.३ मिलिमीटर, माजलगाव १८.५ मिलिमीटर, अंबाजोगाई ३३.१ मिलिमीटर, केज २९.६ मिलिमीटर, धारूर १०.१ मिलिमीटर तर वडवणी तालुक्यात सरासरी ६.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

शिरूर कासार, आष्टी, गेवराई तालुक्यात पावसाचा जोर इतर तालुक्याच्या तुलनेत फार कमी होता. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३२ मंडलात पाऊस झाला. जिल्ह्यातील पावसाची हजेरी लागलेल्या ३२ मंडलांपैकी बहुतांश मंडलातील पाऊस तुरळक हलक्या स्वरूपाचा होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही ठिकाणीच तुरळक पावसाची सर झाली.

जालना जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

सिपोरा मंडळात ३ मिलिमीटर, धावडा १२.३, अनवा ४.३, जाफराबाद ४.५, माहोरा ३, वरुड १२.३, कुंभार पिंपळगाव ५.८, अंतरवली ४.३, जामसमर्थ ८.८, तळणी १७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर मंडळातील पाऊस तुरळक, हलक्या स्वरूपाचा होता.

बीड जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस(मिलिमीटरमध्ये)

बीड २२.८, पाली १८.५, म्हालसाजवळा २७.३, नाळवंडी १६.५, राजुरी ८, पिंपळनेर १५.८, पेंडगाव ११, मांजरसुंबा २०, नेकनूर २८.८, पाटोदा ४७.५, दासखेड ५३.५, थेरला २०.५, पाचेगाव १८, सीरसदेवी ८.५, रेवकी ६.८, तलवाडा ९, माजलगाव २४.८, गंगामसला १३.५, तालखेड १८.५, नित्रुड १७.५, दिंद्रुड २०.५, अंबाजोगाई ९.८, पाटोदा १९.३, लोखंडी सावरगाव १९.३, बर्दापूर ४७.८, केज १४, युसुफ वडगाव ९.३, हनुमंत पिंपरी ५५.८ होळ १३.३, विडा ५९, बनसारोळा ८.८, नांदूर घाट ४६.८, परळी ३८.३, धर्मापुरी २८.३, नागापूर ५७, सीरसाळा ६१.५, पिंपळगाव ४२.५, धारूर ६, मोहखेड १२.८, तेलगाव ११.५, वडवणी ५, कौडगाव ८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT