Sindhudurg Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

Konkan Rain Update : संततधारेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार (ता. २६) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये पावसाचे पाणी साचले होते.

Team Agrowon

Sindhudurg News: संततधारेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार (ता. २६) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. रेड अलर्टमुळे प्रशासनाकडून सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.

मंगळवारीदेखील सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, कुडाळ शहरांत काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे.

कुडाळ येथील भंगसाळ नदीला पूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सिंधुदुर्गला ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वादळीवारे आणि विजांचा गडगडाट देखील होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासनाकडून सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळीवाऱ्यांमुळे रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. त्यादृष्टीने खबरदारीच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय पाऊस

दोडामार्ग ः ३४ मिमी, सावंतवाडी ः ७२ मिमी, वेंगुर्ला ः ११६ मिमी, कुडाळ ः ८८ मिमी, मालवण ः८६ मिमी, कणकवली ः १२८ मिमी, देवगड ः १८० मिमी, वैभववाडी ः ६६ मिमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार

Ambeohol Dam Project Issue: आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही

SCROLL FOR NEXT