Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain: सावंतवाडी, कणकवली, दोडामार्गात मुसळधार पाऊस

Heavy Rainfall: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्यांना शुक्रवारी (ता. १६) जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

Team Agrowon

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्यांना शुक्रवारी (ता. १६) जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वैभववाडी आणि देवगड तालुक्यांच्या काही भागात देखील पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, या पावसानंतर जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून, पावसाचा अंतिम टप्प्यातील आंबा पिकावर परिणाम होणार आहे.

सिंधुदुर्गात सध्या मॉन्सूनसदृश वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ८ मेपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत आहे. सुरवातीला वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात पाऊस पडला.

गुरुवारी दोडामार्ग तालुक्याला झोडपल्यानतंर काल सावंतवाडी तालुक्यात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला. तालुक्याच्या अनेक भागात तासभर जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले. कणकवली तालुक्याच्या अनेक भागांत अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम संपुष्टात आला असून आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

२० मेपर्यंत येलो अलर्ट

जिल्ह्यात गेल्या सात, आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने यापूर्वी १७ मेपर्यंत येलो अलर्ट दिला होता. परंतु काल सायंकाळी हवामान विभागाने पुन्हा २० मे पर्यत येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत जिल्हयात वादळीवारे आणि विजांच्या लखलखाटांसह पावसाचा अंदाज दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Education Policy: प्रश्‍न विचारा पुन्हा पुन्हा ...

Maharashtra Marketing Board: नव्या व्यवस्थेत न्याय मिळेल?

Heavy Rainfall: जुन्नर-नारायणगाव परिसरात पावसाचा दणका

Vice Chancellorship Selection: कुलगुरू पदासाठीच्या मुलाखतीला चौकशीच्या भोवऱ्यातील शास्त्रज्ञ

Government Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार?

SCROLL FOR NEXT