Monsoon Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : राधानगरी धरणक्षेत्रात अतिवृष्टी; जिल्ह्यात कमीअधिक पाऊस

Monsoon Rain : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राधानगरी, गगनबावडा, चंदगड तालुक्‍यात थांबूनथांबून पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राधानगरी, गगनबावडा, चंदगड तालुक्‍यात थांबूनथांबून पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने धरणासह नद्यांच्या पाण्यात धीम्‍यागतीने वाढ होत आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे ७ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत अतिवृष्टी झाली.

दाजीपूर येथे ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आजअखेर दाजीपूर परिसरात १२२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राधानगरी लक्ष्मी तलावातील पाण्याची पातळी ११०० क्युसेकने विसर्ग असूनही एक फुटाने वाढत आहे.

संततधार कायम असल्यामुळे पाणलोट क्षेत्रात आवक वाढली आहे. राधानगरी धरण स्थळावर २४ तासांत ८० मिमी पाऊस झाला, तर काळम्मावाडी परिसरात ७३ मिमी पावसाची नोंद झाली. दाजीपूर येथे ११७ मिमी पाऊस नोंदला गेला. दाजीपूर परिसर राधानगरी तलावाचे पाणलोटक्षेत्र असल्यामुळे येथे झालेले पर्जन्यमान आणि पाणी थेट धरणामध्ये येते. ही आवक सोळाशे ते २००० इतकी आहे.

धरणांतील पाणीसाठा असा (टीएमसी)

राधानगरी २.५४, तुळशी १.३३, वारणा ११.८५, दूधगंगा ४.५३, कासारी ०.९२, कडवी १.२८, कुंभी ०.९२, पाटगाव १.६१, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.५६, जंगमहट्टी ०.४९, घटप्रभा १.४३, जांबरे ०.५४, आंबेआहोळ ०.८९, सर्फनाला ०.०३ व कोदे लघु प्रकल्प ०.०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT