Kolhapur Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Weather Update : कोल्हापुरात जोरदार पाऊस; शिरोळ तालुक्यात ऊस पिकाचे नुकसान

Cyclone Fengal Update : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Forecast : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये दानोळी, कोथळी, अब्दुललाट तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक भागात पाऊस पडला. यामध्ये दानोळी परिसरात सायंकाळी अचानक वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झाले. आठवडी बाजारातील विक्रेता व नागरिकांची पावसाने तारांबळ उडाली.

जोरदार झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने ऊस तोडी व वाहतूक ठप्प झाल्या. भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. सायंकाळी अचानक वारा सुरू झाला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाला. ऊस तोड, उसाने भरलेली वाहने बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, कोल्हापुरातील कसबा बावड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

कोल्हापुरात आणखी पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे. राज्यात तापमानातील वाढ कायम राहून, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूरमध्ये आज संमिश्र वातावरण राहील. घाटमाथ्यासह काही ठिकाणी विजांसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT