Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गारपिटीचा फटका

Nashik Storm Update: नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (ता.६) निफाड, नाशिक, सिन्नर, देवळा, चांदवड, पेठ, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार सरी बरसल्या. यामध्ये निफाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. घरे व द्राक्ष बागा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (ता.६) निफाड, नाशिक, सिन्नर, देवळा, चांदवड, पेठ, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार सरी बरसल्या. यामध्ये निफाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. घरे व द्राक्ष बागा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर घरे, शाळा खोल्यांचे पत्रे उडाले आहेत. नाशिक ते निफाड दरम्यान अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब पडल्याने वाहतूक विस्कळित झाली. गेल्या ३० दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीशी जिल्ह्यातील शेतकरी सामोरा जात आहे.

निफाड तालुक्याच्या पश्चिम टप्प्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कसबे सुकेणे, थेरगाव, चांदोरी, चितेगाव फाटा, पिंपळससह परिसरातील गावांमध्ये याचा मोठा तडाखा बसला. कसबे सुकेने परिसरात गारपीट व जोरदार पावसामुळे नुकसान वाढले.

अतिवृष्टीसदृश पावसामुळे सर्वत्र शेतातून पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळाले. ओढे-नाले भरून वाहिल्याने सर्वत्र परिसर जलमय होता. गारांच्या फटक्यात द्राक्ष बागांची कोवळी पाने फाटली आहेत, तर काड्या मोडल्या. दहिवड (ता.देवळा) येथील जिजामाता शाळेच्या सहा वर्गखोल्यांवरील पत्रे उडाल्याने शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

जनावरे मृत्युमुखी

कसबे सुकेणे (ता.निफाड) येथील सदाशिव जगन्नाथ शेवकर यांची गाय वादळी पावसाने मृत्युमुखी पडली, तर निरगुडे(ता.पेठ) येथील नामदेव देवजी थाळकर यांचा एक बैल व एक गाय वीज पडून मृत्युमुखी पडला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT