Strawberry  Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Strawberry Nursery : गेल्या चार- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने परिसरातील स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Satara News : गेल्या चार- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने परिसरातील स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच भर म्हणून रोपांचे दरही पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

स्ट्रॉबेरी हे पीक महाबळेश्वरची ओळख असली, तरी रोपांच्या निर्मितीसाठी वाई, जावळी व कोरेगाव तालुक्यांवर अवलंबून राहावे लागते. यंदाही महाबळेश्वर तालुक्यातील, तसेच अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या मातृवृक्षापासून रोपे तयार केली होती.

मे व जून अशा दोन टप्प्यांत ही निर्मिती झाली. मात्र, यंदा सततच्या पावसाने, तसेच रोग किडींच्या प्रादुर्भावाने रोपे तयार करण्यात प्रचंड अडचणी आल्या. त्यातच मजुरांचीही मोठी टंचाई निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडून इतर तालुक्यातून मजूर आणण्याची वेळ आली.

स्ट्रॉबेरी रोपांना यावर्षीदेखील चांगला दर राहील, या आशेवर अनेक शेतकऱ्यांकडून मजुरांवर खर्च करण्यात आला. मध्यंतरी काही काळ पावसाने विश्रांती दिल्याने पहिल्या टप्प्यातील अनेकांची रोपे नऊ ते दहा रुपयांपर्यंत विकली गेली.

मात्र, आज पंधरा दिवसांतच रोपांचे दर निम्म्याहून खाली आले आहेत. त्यातच भर म्हणून सतत पडत असलेल्या संततधार पावसाने रोपांच्या लागणीही रखडल्या आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या, त्यांना मररोगाचा सामना करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT