Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : दिवाळीपूर्वी मिळणार अतिवृष्टीची मदत

Heavy Rain Crop Loss : नुकसानीची मदत दसरा व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. याद्या तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या असून, प्रशासन कामाला लागले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी शासनाने मदत जाहीर करीत निधी वितरित केला आहे. नुकसानीची मदत दसरा व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. याद्या तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या असून, प्रशासन कामाला लागले आहे.

गेला जुलै महिना हा शेतकऱ्यांची कसोटी घेणारा ठरला. अतिवृष्टी व पुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नदी-नाल्यांच्या काठची शेतजमीन पुरामुळे खरडून गेली. अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली. परिणामी, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा हंगाम हातून गेला. शेतकरी संकटात असल्याने शासनाने मदत जाहीर केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, अजूनही निधी वितरित करण्यात आलेला नाही. जिल्ह्याला २०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे बचत खाते क्रमांक घेण्यापासून ते निधी वितरित करणे असा प्रवास असणार आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन हेक्टरपर्यंत दोन लाख १७ हजार २४१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात शेतकऱ्यांची संख्या दोन लाख ६३ हजार आहे. शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त दहा हजार ७५७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १९ कोटी ७६ लाख ६३ हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT