Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur Rain Update : नागपुरला पाऊस अन् गारपीटने झोडपले; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट घोषित 

Vidarbha Weather Update : नागपूर शहर आणि परिसराला शनिवारी (ता.१६) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाने झोडपले. यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : नागपूरसह परिसरात उष्म्यात वाढ झाल्याने पाऊसाची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान शनिवारी (ता.१६) विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीने परिसराला झोडपून काढले. यामुळे शहराच्या काही भागात झाडे उन्मळून पडली. तसेच घरात पाणी शिरने लोकांची एकच तारांबळ उडालेली होती. यातच आता हवामान विभागाकडून नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून गरज नसताना घराबाहेर पडून नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

शनिवारी (ता.१६) सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या देवगिरीसह काही भागात झाडे उन्मळून पडली. तर काही भागांतील घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची ताराबंळ उडालेली होती. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.  

वादळी वाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीसह रिझर्व्ह बँके जवळ, सुगतनगर, अशोकनगरसह शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासह वीजपुरवठाही खंडित झाला होता. 

हवामान विभागाचा अलर्ट

हवामान विभागाकडून १८ आणि १९ मार्च रोजी नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT