Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : नांदेड जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच

Nanded Rain News : नांदेड जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यात किनवट वगळता इतर १५ तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीपपूर्व पेरण्यांची कामे खोळंबली आहेत.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी शुक्रवारी (ता. २३) दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ता. २४ मे रोजी ऑरेंज अलर्ट व २३, २५ व २७ मे हे तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.

ता. २३, २५, व २७ मे या तीन दिवसांतील व २५ व २७ मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. २६ मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने रिपरिप लावली आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात होत आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व कामांना ब्रेक लागला आहे. शेतकऱ्यांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतातील नाले वाहून त्यात गाळ साचली आहे. शनिवारी (ता. २४) पावसाचा जोर अधिक असल्याने सूर्यदर्शन झाले नाही.\

शुक्रवारी झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड २४.२, बिलोली ३४.३, मुखेड २६.२, कंधार २२.०, लोहा १८.३, हदगाव १५.२, भोकर ४.५, देगलूर २८.८, किनवट शून्य, मुदखेड ११.०, हिमायतनगर २५.५, माहूर २६.९, धर्माबाद १६.९, उमरी १२.६, अर्धापूर १०.३, नायगाव १४.६. एकूण २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT